राज्यात पत्रकारांनाही पेन्शन; राज्य सरकारची मंजुरी

मराठी पत्रकार परिषदेच्या प्रयत्नांना यश

मुंबई  : रायगड माझा 

पत्रकारांसाठी मासिक पेन्शन योजना सुरू करावी, या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर आज राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या व सलग २० वर्षे पत्रकार म्हणून सेवा बजावलेल्या पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ‘बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ या नावाने ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन्ही सभागृहात मांडण्यात येणाऱ्या पुरवणी मागण्यांमध्ये पत्रकार सन्मान योजनेसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या निधीतून पेन्शन सुरु करण्यात येणार आहे.गेले अनेक वर्ष मराठी पत्रकार परिषदेसह राज्यभरातील पत्रकारांच्या अनेक संघटनांनी या विषय सातत्याने लाऊन धरला होता .

माहिती आणि जनसंपर्क विभागाने या पेन्शन योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. या योजनेनुसार वयाची ६० वर्षे पूर्ण केलेला व सलग २० वर्षे पत्रकार म्हणून सेवेत राहिलेला पत्रकार पेन्शनसाठी पात्र ठरणार आहे. या पत्रकाराला महिना १० हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत