राज्यात मुंबई, ठाण्यासह कोकणात गारठा वाढणार!

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मागच्या आठवड्यात ऐन थंडीत मुंबई ठाण्यासह उपनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस पडला होता. त्यानंतर मात्र तपामानात घट झाली होती. दरम्यान या आठवड्यात बऱ्यापैकी मुंबईसह उपनगरात गारवा जाणवत होता.

येत्या सोमवारपासून मुंबई ठाण्यासह कोकण विभागातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या आठवड्यात मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरात तापमानात मोठी घट होण्याची शक्यता असून 12 ते 14 डिग्रीपर्यंत तपामान खाली येण्याची शक्यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत