राज्य विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन ४ ते २० जुलैदरम्यान

मुंबई:रायगड  माझा 

 विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यंदा प्रथमच नागपूरमध्ये हाेत अाहे. ४ जुले ते २० जुलैदरम्यान हाेणाऱ्या या अधिवेशनातील विधानसभा व विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मंगळवारी निश्चित करण्यात आले. तसेच शासकीय कामकाजाच्या नियोजनावरही चर्चा करण्यात आली. या अधिवेशन कालावधीत ७, ८, १४ अाणि १५ जुलै राेजी शनिवार, रविवार असल्याने सुटी असणार आहे.

विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, शिक्षण मंत्री विनोद तावडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अजित पवार, जयंत पाटील, गणपतराव देशमुख उपस्थित होते. तर विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, आमदार सुनील तटकरे, भाई गिरकर, जयंत पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, नागपूरला दरवर्षी होणारे हिवाळी अधिवेशन आता मुंबईत होणार असल्याचे सांगण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत