राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर आज तिसऱ्या दिवशी मागे

मुंबई : रायगड माझा वृत्त 

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आज तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. सरकारशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ७ ऑगस्टपासून संप पुकारला होता. मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी असे जवळपास १७ लाख सरकारी कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. मागण्यांसंदर्भात सरकारशी यशस्वी चर्चा झाल्यानंतर हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत