राज आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रामराम करत ‘या’ नेत्याने केला भाजपात प्रवेश

शिवसेनेचे उपनेते आणि वाहतूक संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी रात्री नाट्यमयरित्या भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हाजी अराफात शेख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

महामंडळ नियुक्त्यांमध्ये शेख यांची राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली होती, मात्र ती शिवसेनेकडून नाही तर भाजप कडून होती अशी माहिती आता समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेख यांची आयोगाच्या उपाध्यक्ष पदासाठी पक्षात उद्धव ठाकरेंकडे लॉबिंग सुरु होती. पण नागपूरचे जगन्नाथ अभ्यंकर यांची उपाध्यक्ष पदावर वर्णी लागली. त्यातच शेख यांची भाजपाकडून आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आणि त्यानंतर प्रवेशाचा नाट्यमय सोहळा झाला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत