राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींना पुन्हा एकदा टोला

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा साधलाय. काँग्रेसने मोदींना छळलं म्हणून मोदी जनतेला छळत आहेत, असा टोला राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रातून लगावला आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून नरेंद्र मोदींवर निशाणा साधणारं व्यंगचित्र शेअर केलं आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला काँग्रेसनी छळलं होतं असं मोदींनी म्हंटलं होतं . आणि या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटलं आहे. या व्यंगचित्रात मोदींनी एका व्यक्तीला हातात उचलेला दाखवण्यात आलं आहे. ती व्यक्ती म्हणजे भारतीय जनता असं दाखवण्यात आलं आहे. आणि काँग्रेसने मला छळलं म्हणून मी तुला छळतोय, असं मोदी बोलताना दाखवण्यात आलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत