राज ठाकरेंचा सोमवारपासून रायगड दौरा, नागरिकांशी साधणार संवाद

कर्जत :रायगड माझा 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संवाद दौरा आता रायगड जिल्ह्यात धडकणार आहे. सोमवारपासून राज ठाकरे उद्या पासून ४ दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. या संवाद दौऱ्यात ते प्रत्येक मतदार संघातील समस्यांची माहिती आणि संबंधितांचे प्रश्न ते समजून घेणार आहेत. कर्जत येथील पत्रकार परिषदेत मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी ही माहिती दिली.

१४ मे पासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. यावेळी ते रायगड जिल्ह्यातील ७ विधानसभा क्षेत्रांना भेटी देणार आहेत. सुरुवातीला ते कर्जत येथे येणार असून तेथील यशदा मंगल कार्यालयात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. या भेटीला विविध क्षेत्रातील साधारण ६० मान्यवरांशी ते चर्चा करणार आहेत.

यानंतर ते कर्जतहून अलिबागनंतर रोहा, श्रीवर्धन, महाड, पेण व शेवटी १७ तारखेला पनवेल विधानसभा असा हा संपूर्ण दौरा असणार आहे. या दौऱ्यात राज ठाकरे हे प्रकल्पग्रस्त शेतकरी, प्रकल्पग्रस्त कामगार यांच्या भेटी देखील घेणार आहेत. या ४ दिवसीय दौऱ्यात राज ठाकरे यांचा झंझावात रायगडात पाहायला मिळणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.