राज ठाकरेंच्या धावत्या कर्जत दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्ते हिरमुसले 

शिवरायांचाही पडला विसर

कर्जत : रायगड माझा वृत्त

राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्याची सुरवात सोमवारी सकाळी कर्जत मधून झाली. मात्र राज ठाकरे नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिरा आले आणि त्यातही फक्त खालापूरच्याच पदाधिकाऱ्यांना वेळ दिल्याने राज यांची भेट व शब्द ऐकण्यासाठी जमलेल्या कर्जत कार्यकर्त्यांची पुरती निराशा होऊन त्यांचे चेहरे हिरमुसले. तर पत्रकार परिषदही रद्द केल्याने सकाळपासून राज ठाकरेंच्या बाईट घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पत्रकारांचीही घोर निराशा झाली.
 
जमेची बाजू एव्हढीच कि यावेळेस कर्जत मधील काही अभ्यासू व्यंक्तींची भेट मनसे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी राज ठाकरेंबरोबर घडवून आणली. या भेटीत सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांनी कुपोषण आणि आरोग्य समस्यांची मांडणी केली. तसेच आदिवासींच्या रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी कायमस्वरूपी व परंपरागत व्यवसाय वाढीसाठी  शासन स्तरावर वेगवेगळे प्रयोग करण्याचे ठरवले. तर मेडिकल असो.अध्यक्ष डॉ. स्वप्नील पडते यांनी येथील शासकीय आरोग्य सेवा सक्षम करण्यावर भर देण्यासंबंधी भाष्य केले तर कर्जत रेल्वे पॅसेंजर असो.चे पंकज ओसवाल यांनी कर्जत पनवेल लोकल सुरु करणे , लांब पल्ल्यांच्या गाडयांना थांबा आधी मागण्यांवर चर्चा केली. आदी विविध विषयांवर यावेळी उपस्थित नागरिकांनी थोडक्यात चर्चा केली .
त्यानंतर आलेल्या खालापूरच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांचे म्हणणे एकूण घेतले. आणि संघटना वाढीच्या सूचना दिल्या . त्यानंतर कर्जतच्या कार्यकर्त्यांना राज भेट देतील अशी अपेक्षा असतांनाच अचानक राज यांनी पुढील दौऱ्यासाठी निघाले सुद्धा. त्यामुळे उपस्थित जमलेल्या कार्यकर्त्यांची राज यांची भेट घेण्यासाठी अथवा त्यांची छबी टिपण्यासाठी एकच झुंबड उडाली .

खेद व खंत | शिवरायांचाही पडला विसर 

ज्या शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करतात त्याच शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अपूर्ण करण्यास राज ठाकरेंना विसर पडला अखेर निघतांना त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी त्यांना याची आठवण करून देताच काही क्षण मागे फिरून राज ठाकरे यांनी व्यासपीठाजवळील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला . 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत