राज ठाकरेंच्या नव्या व्यंगचित्रातून मोदी आणि फडणवीसांवर निशाणा!

मुंबई : रायगड माझा 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या नवीन व्यंगचित्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री साहेब ह्या विषारी वेली आत्ताच छाटा! वेळ काढलात तर झाडही पोखरून काढतील हं…चला लागा कामाला! असं लिहीत मुख्यमंत्र्यांना मराठी माणुस कुऱ्हाड देतांना दाखवलं आहे.

तर खालच्या कोपऱ्यात मोदींना व्यायाम करतांना दाखवत सामान्य माणसाला रडतांना दाखवलं आहे. अशाप्रकारे राज ठाकरेंनी मोदी आणि फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत