राज ठाकरेंनी केली मनसे कार्यकर्त्यांची निराशा

कार्यकर्त्यांशी संवाद न साधता राज ठाकरे पुढील दौऱ्यावर

कर्जत :रायगड माझा वृत्त
राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्याची सुरवात सोमवारी सकाळी कर्जत मधून झाली . मात्र राज ठाकरे नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिरा आले आणि त्यातही फक्त खालापूरच्याच पदाधिकाऱ्यांना वेळ दिल्याने राज यांची भेट व शब्द ऐकण्यासाठी जमलेल्या कर्जत कार्यकर्त्यांची पुरती निराशा होऊन त्यांचे चेहरे हिरमुसले . तर पत्रकार परिषदही रद्द केल्याने सकाळपासून राज ठाकरेंच्या बा प्रतीक्षेत असलेल्या पत्रकारांचीही घोर निराशा झाली .
राज ठाकरे  यांच्या रायगड मधील संवाद   दौऱ्याची सुरवात कर्जत पासून झाली . कर्जत दौऱ्यात राज ठाकरे यांनी पत्रकार आणि कार्यकर्ते यांची निराशा केली . जमेची बाजू एव्हढीच कि यावेळेस कर्जत मधील काही अभ्यासू व्यंक्तींची भेट घेतली . याभेटीत कुपोषण , कर्जत पनवेल रेल्वे सेवा , आदिवासींचे रोजगारासाठो होणारे स्थलांतर यासंदर्भात उपस्थित मान्यवरांशी चर्चा केली.नंतर आलेल्या खालापूरच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांचे म्हणणे एकूण घेतले . आणि संघटना वाढीच्या सूचना दिल्या . त्यानंतर कर्जत च्या कार्यकर्त्यांना राज भेट देतील अशी अपेक्षा होती.   मात्र  अचानक राज यांनी पुढील दौऱ्यासाठी निघाले सुद्धा .  राज ठाकरे यांचा कर्जत दौरा मनसेला बळकटी देण्याऐवजी मनसे  कार्यकर्त्यांना अन्य पर्याय शोधण्यासाठी प्रवृत्त करणारा ठरेल  असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत