राज ठाकरेंनी घेतली मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंची भेट

मालाड येथे फेरीवाल्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्या भेटीसाठी रविवारी राज ठाकरे बोरिवलीत येणार आहेत. काल मनसेचे कार्यकर्ते मालाड रेल्वे स्थानकाच्या परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला. यावेळी काही जणांनी माळवदे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केले. तसेच त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये माळवदे गंभीर झाल्यामुळे त्यांना मालाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर राज ठाकरे त्यांची भेट घेणार होते. मात्र, त्यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरु असल्याने राज ठाकरेंनी ही भेट पुढे ढकलली. दरम्यान, प्रकृती बिघडल्यामुळे काही वेळापूर्वीच माळवदे यांना बोरिवलीतील ऑस्कर रूग्णालयात हलवण्यात आले आहे. याच ठिकाणी आज राज ठाकरे त्यांची भेट घेणार आहेत. माळवदे यांना मारहाण झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते कालपासूनच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आदेश देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत