राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून मोदींचा ‘आरक्षणाचा पतंग’ कापला !

मुंबई: रायगड माझा वृत्त

आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मकरसंक्रांतीची संधी साधत व्यंगचित्रातून खिल्ली उडवली आहे. राज ठाकरेंच्या मते, ही एक नवी थाप आहे असे त्यांनी व्यंगचित्रात दर्शवले आहे.

नेहमीच राज ठाकरे आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका करत असतात. मंगळवारीही म्हणजेच मकरसंक्रांतीनिमीत्त त्यांनी एक व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रामध्ये मोदी पंतग उडवत आहेत. त्या पतंगावर नव्या थापा, १० टक्के आरक्षण असे लिहण्यात आले आहे. तर अमित शाह यांनी मोदींची रिंगी पकडली आहे. मोदींना ‘पतंग’ उडवण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात मोदींच्या ‘कापलेल्या पतंगांचा’ ढिगारा म्हणजेच फसलेल्या  निर्णयांचा खच पडला आहे, असे दर्शवण्यात आले आहे.

No photo description available.

या व्यंगचित्रात मोदी यांच्यासोबत अमित शाह, मोदी भक्त, आणि काही मीडिया यांची उपस्थिती दर्शवली आहे.  त्यांनी हे व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत