राज ठाकरे म्हणजे एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट…

मुंबई: महाराष्ट्र News 24 वृत्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कोणत्या ना कोणत्या कारणामुळं सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘राष्ट्रपिता’ संबोधून त्यांनी चर्चेला तोंड फोडले होते. त्यामुळं ट्रोल झाल्यानंतरही आपल्या वक्तव्यावर ठाम असलेल्या अमृता यांनी आता राज ठाकरे यांच्याबद्दल भाष्य केलं आहे. राज ठाकरे म्हणजे एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट… अस त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी त्यांना नरेंद्र मोदी यांच्याबद्दल विचारण्यात आल असता  ‘नये भारत के राष्ट्रपिता’ असं वर्णन अमृता यांनी केलं. अमृता यांच्या या मतामुळं काही दिवसांपूर्वी वादळ उठलं होता तरीही त्या आपल्या मतावर ठाम असल्याचं दिसून येत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या  मुलाखतीत अमृता यांना देशातील प्रमुख राजकीय नेत्यांबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यात अर्थातच राज ठाकरे यांचा समावेश होता. तेव्हा राज यांचं वर्णन त्यांनी एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट… अशा शब्दांत केलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत