राज ठाकरे यांची जॉर्ज यांना हटके आदरांजली

मुंबई: रायगड माझा वृत्त

कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला… अशी समर्पक भावनाही राज यांनी या व्यंगचित्रासोबत व्यक्त केली आहे.

मुंबईसह देशभरातील अनेक कामगार संघटनांचे नेतृत्व करणारे जॉर्ज फर्नांडिस हे एक लढवय्ये नेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या एका हाकेवर हजारो कामगार रस्त्यावर उतरायचे आणि शहरं बंद होऊन जायची. फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील असे अनेक बंद व संप देशानं पाहिले. त्यामुळं ‘बंद सम्राट’ अशी त्यांची ओळख बनली होती. तोच धागा पकडून राज यांनी फर्नांडिस यांचं व्यंगचित्र रेखाटलं आहे. या चित्रात जॉर्ज हे एका माइकसमोर दोन्ही हात उंचावून आवेशात भाषण करताना दिसत आहेत. त्यांच्या एका हातात कामगारांच्या मागण्यांचं पत्रक असून दुसऱ्या हाताची मूठ आवळलेली आहे. त्यांच्या अंगात नेहमीचाच साधासुधा झब्बा लेंगा आहे. राज यांचं हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत