राज-भुजबळ भेटीमुळे चर्चांना उधाण

raj-and-chhagan

मुंबई : रायगड माझा वृत्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. राज यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी सोमवारी रात्री झालेल्या या भेटीमुळे मनसेला महाआघाडीत सामावून घेण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ आग्रही असल्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे.

राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. आता भुजबळांच्या भेटीनंतर आगामी काळात मनसे महाआघाडीत सामील होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. नाशिक जिल्ह्यात मनसे आणि छगन भुजबळ अशी दोघांचीही ताकद आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत