रात्री अचानक घरातून गायब झाले नंदई अन् तरुणी, सकाळी एकाच दोरीने घेतला गळफास

बाडमेर : रायगड माझा

जिल्ह्यातील सिणधरी परिसरात एका तरुणीने रात्री उशिरा आपल्या प्रियकरासोबत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी खेजड़ीच्या झाडावर दोरीला गळफास घेतलेल्या प्रेमीयुगुलाला लटकलेले पाहून गावात खळबळ उडाली.

– शेकडोंच्या संख्येने गावकरी तेथे गोळा झाले. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहांना उतरवून पोस्टमॉर्टमसाठी मोर्चरीमध्ये पाठवले. तथापि, आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलिस प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या करण्यात आल्याचे सांगत आहेत.

असे आहे प्रकरण…
– पोलिसांनी सांगितले की, ही घटना सिणधरीच्या चारणान गावात झाली. मृत चूनाराम जाट जागसा गावचा रहिवासी होता. तर मृत मानगी ही चारणान गावातील रहिवासी होती. मृत तरुण तरुणीचा नात्याने नंदई लागत होता.
– ते दोघेही शुक्रवारी रात्री उशिरा घरातून निघाले. त्यांच्या कुटुंबीयांना याची काहीच कल्पना नव्हती. शनिवारी पहाटे त्यांचे मृतदेह झाडाला लटकलेले असल्याची माहिती मिळाल्याने दोन्ही कुटुंबांत आक्रोश सुरू झाला. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत