रामदास आठवलेंनी मागितली माफी

 

रायगड माझा वृत्त

“मी मंत्री असल्याने मला पेट्रोल, डिझेल फुकट मिळते त्यामुळे मला इंधन दरवाढीच्या झळा बसत नाहीत” असे वादग्रस्त वक्तव्य करत काल केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी इंधन दरवाढीने त्रस्त असलेल्या सामान्य जनतेचा चांगलाच रोष ओढवून घेतला होता. आठवलेंच्या ‘या’ विधानानंतर कालपासूनच समाजमाध्यमांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.

परंतु आज स्वतः आठवले यांनी आपल्या वक्तव्या बाबत माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आज माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले की “मी एक सामान्य माणूस असल्याने, मला सामान्य माणसाच्या समस्यांचे भान आहे. मी सरकारचा हिस्सा असून, मीही इंधनाचे भाव कमी करण्याची मागणी करत आहे. माझ्या कालच्या वक्तव्याने जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो.”

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत