रामदास आठवले ‘सिल्व्हर ओक’वर; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्र News 24 वृत्त 

आरपीआय नेते रामदास आठवले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाल्यामुळे  राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपाच्यावतीनं रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. आठवले – पवार यांच्या भेटीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

अडचणीच्या काळात नेहमीप्रमाणेच सल्ला घेण्यासाठी पवारांकडे आलो असल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलय. भाजपा आणि शिवसेना यांच्या महायुतीला जनादेश मिळालाय. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन करावं, असं आपल्याला पवारांनी म्हटलं. तुम्हीच शिवसेना आणि भाजपा सरकार स्थापन करण्याचा सल्ला द्या, असं म्हटल्याचंही आठवले यांनी सांगितलं. याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यातील परिस्थिती दुरुस्त व्हावी म्हणून सल्ला घ्यायला आठवले माझ्याकडे आले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत