राम मंदिराबाबत कोर्टाने हिंदूंच्या भावना समजून घ्याव्यात : आरएसएस

ठाणे : रायगड माझा ऑनलाईन

राम मंदिर बांधणे हे आमचे कर्तव्य आहे, त्याबाबत तातडीने पाऊले उचला अन्यथा १९९० प्रमाणे देशव्यापी आंदोलन उभारावे लागेल, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी सरकारला सुनावले आहे.

भाईदंर येथील म्हाळगी प्रबोधिनी येथे संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय कार्यकारणी बैठक आयोजित आली होती. यावेळी जोशी यांनी वरील इशारा दिला. गुरुवारी रात्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी देखील या कार्यक्रमास अचानक भेट दिली होती. यावेळी शहा व जोशी यांच्यात बराच वेळ गुप्त चर्चाच झाली. यावेळीही राम मंदिराचा विषय मुख्य अजेंड्यावर होता.

सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल, अशी आमची आशा आहे, असे सांगताना राम मंदिर हा आमचा मुख्य मुद्दा असल्याचे ते म्हणाले. आम्ही संविधान मानतो, मात्र न्यायालयानेही लोकांच्या भावनेचा विचार केला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. राम मंदिर नियोजित जागेवर होते याचे भक्कम पुरावे न्यायालयासमोर आले आहे. जर ही वस्तुस्थिती आहे तर ती मान्य करून पुढे जाण्यास अडचण काय, असा सवाल करीत जोशी पुढे म्हणाले की आम्ही न्याय संविधान मानतो पण याचा अर्थ सामाजिक भावनांचा विचारच करू नये असा होत नाही. असे सांगत संवेदनशील विषयाकडे सर्वांनीच त्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमित शहा- मोहन भागवत यांची भेट
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये राम मंदिर निर्मितीसाठी अध्यादेश आणण्याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. भाईदंर येथे झालेल्या आरएसएसच्या कार्यकारिणीची बैठकी दरम्यान अमित शहा यांनी भागवत यांच्यासह आरएसएच्या अन्य नेत्यांबरोबर चर्चा केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत