राम मंदिराला विरोध केला तर सरकार पाडू : सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

Image result for SUBRAMANIAN SWAMY
राम मंदिर प्रकरणावर जानेवारीत सुनावणी होणार आहे. त्यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने राम मंदिर उभारणीला विरोध केल्यास दोन्ही सरकार पाडू, असा इशारा भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका कार्यक्रमात सुब्रमण्यम स्वामी यांनी हा इशारा दिला. राम मंदिर उभारणीचं प्रकरण जानेवारीत पटलावर येणार आहे. आम्ही दोन आठवड्यात जिंकू. केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हे दोन्ही पक्षकार आमचे विरोधक आहेत. मला विरोध करण्याची त्यांची हिंमत आहे का? जर त्यांनी मला विरोध केला तर मी सरकार पाडेन. मात्र ते मला विरोध करणार नाहीत हे मला माहीत आहे, असं स्वामी म्हणाले.

दरम्यान, अयोध्येत राम मंदिर उभारण्यास मुसलमानांचा विरोध नसल्याचा दावाही त्यांनी केला. काही मुस्लिमांशी मी व्यक्तीगत भेट घेतली तेव्हा त्यांनी राम मंदिर उभारणीस विरोध नसल्याचं स्पष्ट केल्याचंही ते म्हणाले. मोघल सम्राट बाबरने ताब्यात घेतलेला हा भूखंड आमचा आहे, असं सुन्नी वक्फ बोर्डाने म्हटलंय. पण त्या जागेवर पुन्हा मशीद उभारायची आहे, असं त्यांनी म्हटले नाही, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत