रायगडच्या बोर्ली पंचतनचा अजिंक्य केरळच्या क्रिकेट संघात

केरळ क्रिकेट संघात अजिंक्य पाटीलची निवड

साहिल रेळेकर | 

रायगडची माती म्हणजे गुणवंतांचा खाण आहे. विविध क्षेत्रात अनेकांनी आपल्या कर्तृत्वाने रायगडचे नाव उंच केले आहे. यामध्ये आता अजून एक नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे अजिंक्य नंदकुमार पाटील याचं. बोर्ली पंचतन येथील अजिंक्यची केरळ क्रिकेट असोसिएशनच्या २१ वर्षाखालील संघातून खेळण्यासाठी अजिंक्यची निवड झाली आहे.

 

केरळ क्रिकेट संघात अजिंक्य पाटीलची निवड

बोर्ली पंचतंन … निसर्गाचा वरदहस्त लाभलेले गाव. याच गावात अन्य मुलांप्रमाणे अजिंक्यने क्रिकेटचे धडे गिरविले. शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतानाही क्रिकेट त्याचा श्वास होता. फायर अँड सॅफ्टचे व्यावसायिक शिक्षण त्याने पूर्ण केले पण क्रिकेट त्याच्यासाठी सर्वस्व झाले होते. पंचक्रोशीतील क्रिकेटची मैदाने गाजविणाऱ्या अजिंक्यला वेध लागले होते ते नवे आभाळ कवेत घेण्याचे. हे स्वप्न घेऊनच तो मुंबईला आला. भांडुप येथील एका क्लबतर्फे त्याने क्रिकेट खेळण्यास सुरवात केली. गुणवत्ता तर होतीच ती फुलायला संधी मिळाली.

अजिंक्यने आजवर सलग 2 वेळा महाराष्ट्राच्या संघातून खेळण्याचा तसेच 21 वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्र क्रिकेट संघाचे कर्णधार पद भुषविण्याचा बहुमान प्राप्त केलाय. आणि विशेष म्हणजे याच दरम्यान दोनवेळा मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय. कोल्हापुर येथे महाराष्ट्र संघातून खेळत असताना केवळ 68 चेंडू मध्ये तब्बल 130 धावा करणारा अजिंक्य एकमेव खेळाडू ठरला.

केरळ क्रिकेट संघात अजिंक्य पाटीलची निवड

खेड येथील एक स्पर्धा त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. निवड चाचणी फेरीत खेळत असताना केरळ क्रिकेट असोसिएशनने अजिंक्यची फलंदाजी अचूक हेरली आणि लगेचच आपल्या टीममध्ये खेळण्याची संधी दिली. त्याच्या यशाचा त्याचे आई वडील आणि गावकऱ्यांनाही अभिमान आहे. पुढील काळात प्रथमदर्जाचे क्रिकेट खेळण्याचे अजिंक्यचे स्वप्न आहे. त्यासाठी कठोर परिश्रमाची देखील त्याची तयारी आहे . २६ फेब्रुवारी २०१९ ला होणाऱ्या स्पर्धेत अजिंक्य केरळचे प्रतिनिधित्व करणार आहे. बोर्ली पंचतनच्या लालमातीतील हा युवा खेळाडू नावाप्रमाणे अजिंक्य व्हावा अशी तमाम रायगडकरांची अपेक्षा आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत