अलिबाग : रायगड माझा वृत्त
रायगड जिल्ह्याला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले असून या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सावित्री नदी तसेत इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पाणी शिरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुरक्षेच्या दृष्टीने आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस असून सकाळी देखील पावसाचा जोर कायम आहे. महाड शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने या शहराला जोडणारे दोन रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच महाड ते रायगड वाहतूक देखील बंद करण्यात आल्याने या भागातून जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाला आहे. महाड बाजारपेठेत देखील पाणी शिरल्याने दुकानांचे नुकसान झाले आहे.
शेयर करा