रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची निर्घृण हत्या

कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे सरचिटणीस प्रताप दाभाडे यांची निर्घृण हत्या

रायगडचे अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ यांची घटनास्थळी 

दाभाडे यांच्या हत्येप्रकरणी कर्जत पोलिसांची तपास यंत्रणा सुरु

कर्जत : रायगड माझा वृत्त

कर्जत तालुक्यातील मांडवणे ग्राम पंचायत हद्दीतील आंबेवाडी येथे राष्ट्रवादी युवकचे तालुका सरचिटणीस प्रताप दाभाडे (४५) रा . मांडवणे यांच्या डोक्यात वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे .

या संदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे अधिक तपास करीत आहेत .

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, प्रताप दाभाडे हे याच मांडवणे परिसरात असलेल्या रिव्हर टच रिसॉर्टचे काम पाहत होते . शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास दाभाडे याच कामासंदर्भात आपल्या स्प्लेंडर ( एम एच ४६ , ए एम २८३२) वरून रिसॉर्टला गेले . रात्रीचे साडे अकरावाजले तरी, पती घरी न आल्याने पत्नी सुवर्णा हिने पतीला फोन केले . फोनची रिंग वाजत होती . मात्र, फोन उचलत नसल्याने त्यांना संशय आला . त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली . तिने दाभाडे यांच्या पुतण्यांना याबाबत सांगितले . पुतण्यांनी त्वरित ग्रामस्थांच्या मदतीने मांडवणे कडून आंबेवाडी मार्गे रिव्हर टच रिसॉर्ट परिसर पिंजून काढण्यास सुरवात केली असता त्यांना रिव्हर गेटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या पायवाटे लगत प्रताप दाभाडे यांची मोटार सायकल दिसून आली . त्यावेळेस त्यांची मोटार सायकल पाहून दाभाडे आजूबाजूस असतील या विचाराने ग्रामस्थांनी आवाज देण्यास सुरवात केली . परंतु, आवाज देऊनही प्रतिसाद न आल्याने आजूबाजूच्या भागात शोध घेत असता , एका ग्रामस्थाने दाभाडे यांच्या मोबाईल वर कॉल केला . तेव्हा काही अंतरावरून मोबाईलच्या रिंगचा आवाज आल्याने ग्रामस्थ त्या दिशेने पुढे सरसरवाले . त्यांच्या पायातील एक चप्पल तर दुसऱ्या चपलेजवळ मोबाईल पडलेला होता . हे दृश्य पाहून काहीतरी अघटित घडल्याचे संकेत मिळाले . त्यानंतर शोध घेतल्या नंतर रस्त्यापासून अवघ्या वीस फूट अंतरावररील शेतजमिनीच्या चरीमध्ये पाहतात तर काय दाभाडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले . त्यांच्या डोक्यावर , चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केलेले दिसून आले . ग्रामस्थांनी त्वरित याबाबत कर्जत पोलीस ठाण्याला खबर दिली . खबर मिळताच पोलीस उप विभागीय अधिकारी जालिंदर नालकूल , पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी आपल्या पथकासहित घटनास्थळी धाव घेतली . यावेळेस तेथे पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी एकाच गर्दी केली . त्यानंतर दाभाडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता. दाभाडे यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

कर्जतमध्ये घडलेले हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी असून पुढील तपासात दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल
(सुजाता तानवडे- पो. नि .कर्जत)

घडलेली घटना समजताच आम्ही आमच्या टिमसह घटनास्थळी धाव घेतली. त्याप्रसंगी झालेला प्रकार अत्यंत घ्रुणास्पद असून या संदर्भात रायगडचे अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनीही पाहणी करुन तपास यंत्रणेवर भर दिला असून दोघींच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील
-जालिंधर नालकुल (उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत पोलिस )

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत