रायगडला वेध नव्या पालकमंत्र्यांचे..

महाराष्ट्र News 24  वृत्त
बदलत्या राजकीय समीकरणात रायगडचे पालकमंत्री कोण होणार याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शेकापची स्थिती वाईट झाल्याने शिवसेनेला आता पालकमंत्रीपदाचे  वेध लागले आहेत. 
मुंबईला लागून असलेला आणि झपाट्याने विकासाच्या वाटेवर असलेल्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अत्यंत महत्वाचे मानले जाते. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाने हे पद आपल्या कडे ठेवले होते. रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्री म्हणून विकासाची कामे केली नसली तरी निवडणुकीत मात्र भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. उरण मध्ये युती असतानाही शिवसेनेचे मनोहर भोईर यांना पराभूत करण्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याचे बोलले जाते. त्यामुळे ते शिवसेनेच्या रडारवर आहेत. राज्यात महायुतीची सत्ता आली तरी रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेना सोडणार नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेकडून हॅटट्रिक करणाऱ्या भरत गोगावलेंचे नाव रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अधिक चर्चेत असल्याचे बोलले जाते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत