रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबेत- म्हाप्रळ पुल कमकुवत

  • दोन जिल्हयाना जोडणारा आंबेत म्हाप्रळ पुल मोजतोस शेवटचा घटका
  • महाड येथिल सावित्री पुल दुर्घटने पेक्षा तिव्र अपघाताची शक्यता
  • ३७ वर्षानंतरही पुलाची डागडूजी नाही
  • सार्व.बांधकाम विभागाने सतर्कतेचे फलक लाऊन झटकली जबाबदारी

म्हसळा : निकेश कोकचा

रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्याना जोडणारा आंबेत-म्हाप्रळ पुल कमकुवत झाला असुन शेवटचा घटका मोजत आहे. या बाबतचे फलक सार्वजनिक बांधकाम विभागाने पुल परिसरात लावले असुन या पुलाच्या दुरुस्ती बाबत कोणतीही कारवाई न केल्याने  महाड येथिल सावित्री पुल दुर्घटनेपेक्षा तिव्र अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेल्या सुचना फलकांमुळे पुल पार करताना परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

रायगड रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा कोंकणातील एकमेव दुवा समजला जाणारा आंबेत – म्हाप्रळ या परिसरातून वाहणाऱ्या सावित्री नदीवरील पूल १९८१ साली  वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री  स्व.बॅ.ए.आर. अंतुले यांनी दोन जिल्हयातील नागरिकांचा प्रवास सुखकारी व कमी वेळत व्हावा यासाठी या पुलाची बांधणी केली होती.
मात्र तब्बल ३७ बर्षा नंतरही आज पर्यंत या पुलाची कोणत्याही प्रकाराची डागडुजी न झाल्याने हा पुल जिर्ण अवस्थेत गेला असुन पुर्ण पणे कमकुवत झाला आहे. पुलकमकुवत बाबतची सुचना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तिन दिवसांआधी परिसरात लाल कलरच्या फलकावर लावण्यात आली असून आपली पुढील जबाबदारी झटकल्याचे पहावयास मिळत आहे. या पुलावरुन  प्रत्यक्षात वाहतूक बंद करण्यात आलेली नसल्याने  आंबेत म्हाप्रळ परिसरातून वाहणाऱ्या सावित्री खाडी वरिल पुलावर दोन वर्षा आधि झालेल्या महाड येथिल सावित्री पुल दुर्घटनेपेक्षा तिव्र अपघात होऊन अनेक नागरिकांचा जिव जाण्याची शक्यता परिसरातील नागरीक वर्तवत आहेत.
दोन जिल्हयाना जोडणाऱ्या आंबेत म्हाप्रळ पुलाखाली सरास पणे बेकायदेशीर वाळू उपसा सुरु असतो. वाळू काढणारा ड्रेझर काही महिन्याआधि पुलांच्या पिलरला धडकला होता, यामुळे पिलर सहित पुलाला तडे गेले असल्याची माहिती ग्रामस्थानी दिली.
सदर आंबेत म्हाप्रळ सावित्री खाडीवरील पूल हा गेल्या कित्येक वर्षापासून रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडण्याचे काम करून दळणवळणाच्या सेवेमध्ये सोयीस्कर होत आहे. हजारो पर्यटक नागरिक व प्रवाशी या पुलावरून ये जा करत असतात परंतु सध्यास्थितीत या पुलाची कमकुवत झाली असल्याचे सूचना फलक लावण्यात आले असून प्रवाशांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी या पुलावरून आम्ही प्रवाशांनी प्रवास करावा की  नाही अशी भिती मनामध्ये निर्माण झाली आहे.
जावेद महालुणकर- स्थानिक नागरिक
आंबेत म्हाप्रळ  पुलाची अवस्था दयनीय झाली असून सदर पूल हा कोणत्याही क्षणी कोसळू शकतो,त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पर्यायी मार्ग म्हणून याच खाडीवर या पुलाच्या शेजारी नवीन पुलाची बांधणी करावी. जेणेकरून जुना पूल कोणत्याही क्षणी कोसळलं तरी त्यास बहुपर्यायी मार्ग म्हणून दुसऱ्या पुलाचा वापर याठिकाणी करता  येईल अन्यथा अशा घटनास्थळी प्रवाशांचे अतोनात हाल होतीलच त्यासोबतच रायगड रत्नागिरी मधील अनेक गावांचा संपर्क देखील तुटून जाईल तरी प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष घालणे गरजेचे आहे. सरस्वती आंबेकर-सरपंच आंबेत
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत