रायगड जिल्हयात १०३ दरडग्रस्त गावे घोषीत

जिल्हयात आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन सज्ज

म्हसळा : निकेश कोकचा
जिल्हयांत २००५ मध्ये दरडी कोसळून बाधीत झालेल्या आपत्तीच्या अनुभवावरुन शासनाचा महसुल विभाग व भारतीय भूवैज्ञानिक विभागाने जिल्हयातील ११ तालुक्यांतील १o३ गावे दरडग्रस्त गावे म्हणून जाहीर केली आहेत. त्या गावामध्ये अपत्तीपूर्व, आपत्तीकालीन व आपत्ती पश्चात अशा त्रिसूत्रींवर आधारीत जनजागृती करण्यासाठी १०मे ला  महाड, ११ मे ला पोलादपूर , ८ मे ला रोहा व सुधागड रोहा येथे होणार आहे. तर माणगाव मध्ये माणगांव, म्हसळा, श्रीवर्धन व तळा तालुक्यासाठी घेण्यात येणार आहे. पनवेल येथे पनवेल, खालापूर व कर्जत तालुक्यांसाठी होणार आहे. मान्सूनपूर्व संभाव्य धोक्याबाबत एकदिवसीय जनजागृती कार्यशाळेसाठी संबंधीत भागातील उप- विभागीय अधिकारी, तहसीलदार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व प्रतिष्ठीत नागरिकाना बोलावले आहे.
भारतीय भूवैज्ञानिक विभागाने भू- सर्वेक्षणाद्वारे  धोक्याच्या तीव्रतेनुसार गावांची वर्गवारी केली आहे. त्यानुसार वर्ग १ मध्ये ९, वर्ग २ मध्ये ११ व वर्ग ३मध्ये ८३ गावांचा समावेश आहे. वर्ग १ मध्ये म्हसळा तालुक्यातील वावे ( शेख मोहलला), आमशेत , महाड तालुक्यातील तुडील(लोअर ), टोळ खुर्दे( बौद्धवाडी), मोरे वाडी ( शिंगर कोंड ),पतेरेवाडी. ( अंबीवली बु ), कोंडीवत, कर्जत तालुक्यातील मुदरे ( बु ) अशी ९ गावे आहेत.
रायगड जिल्ह्यांत फार मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरु आहेत. मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असते त्यामुळे शासन विशेष सर्तक असते. २४ व २७ जुलै २oo५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे वरील ठीकाणी फार मोठया दरडी कोसळल्या होत्या त्या वेळी १९७७ कुटुंबातील ११,६१९ व्यक्तीना स्थलांतरीत केले होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत