रायगड जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा कारागृहातील कैद्यांची कोविड लसीकरण व आरोग्य तपासणी.

अलिबाग-अजय गायकवाड

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या उपस्थितीत अलिबाग जिल्हा कारागृहातील एकूण 25 पुरुष व एक महिला कैदी असे एकूण 26 कैद्यांचे कोविड-19 प्रतिबंध लसीकरण केले आहे. त्याचबरोबर या कैद्यांची रक्तदाब, रक्त, मधुमेह, ताप तपासणी अशा प्रकारे संपूर्ण आरोग्य तपासणीही करण्यात आली.

याप्रसंगी अलिबाग जिल्हा कारागृह अधीक्षक हरिश्चंद्र श्रीरंग जाधवर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, डॉ.श्वेता दिग्विजय कार्वेकर, विनोद ठाकूर, रुता अशोक पाटील, गौरी महेश तोते, किरण तुकाराम सालेकर,भागवत नामदेव वीर, अशोक नथुराम तांडेल, अशोक काशिराम चौधरी, विनोद रघुनाथ पाटील, भूषण बाळासाहेब गिते, सोमनिंग कटेप्पा कांबळे, मनोहर दत्तू बोंबले, संजय हरिभाऊ गावंड, कोमल सुरेश चिलप, जगदीश राऊत यांची उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत