रायगड जिल्हा परिषदेतील 7 कर्मचाऱ्याना कोरोनाची लागण 

 231 कर्मचाऱयांची अँटीजन टेस्ट

 इमारतीचे केले निर्जंतुकीकरण

अलिबाग : धनंजय कवठेकर 
 रायगड जिल्हा परिषदेचे 7 कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे . त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत . गुरुवारी अलिबाग येथील कार्यालयात काम करणाऱ्या 231 कर्मचाऱयांची कोविड अँटीजन टेस्ट करण्यात आली . त्यात हा प्रकार उघडकीस आला . या नंतर जिल्हा परिषदेच्या संपूर्ण इमारतीचे निर्जंतुकी करण करण्यात आले आहे .यापूर्वीही जिल्हा परिषद कार्यालयातील 4 कर्मचाऱ्याना कोरोनाची लागण झाली होती
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत