रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती पदांची निवड 21 डिसेंबरपूर्वी

अलिबाग (रायगड) : धनंजय कवठेकर

 जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांच्या सभापती आणि पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीच्या कार्यक्रमावरून राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागात गोंधळाचे वातावरण आहे. यानिवडीआधी २१ डिसेंबरपूर्वी कराव्यात, असे आदेश दिल्यानंतर मंगळवारी एकाच दिवशी ग्रामविकास विभागाने दोन स्वतंत्र आदेश काढले आहेत. यातील सुधारित आदेशानुसार २० डिसेंबरला या पदाधिकाऱ्यांची मुदत संपत असल्याने त्या ठिकाणी नवीन निवडी करण्यासाठी प्रचलित पध्दतीनुसार नोटीस काढून या निवडी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अशी होईल निवड प्रक्रिया

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडण्कीची प्रक्रिया राबवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. जिल्हाधिकारी स्वत: किंवा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. प्राधिकृत अधिकारी म्हणून आता प्रथमतः निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपवली जाईल. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी विशेष सभेची नोटीस जाहीर करण्यात येईल. त्यासाठी सात दिवस अगोदर ही नोटीस बजावणे बंधनकारक आहे. त्यामुळे या आठवड्यात नोटीस बजावली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा परिषदेतील अंकगणित रायगड जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची सत्ता आहे. जिल्हा परिषदेचे एकूण ५९ सदस्य आहेत. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष २3 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १२ सदस्य, काँग्रेस पार्टी 3 सदस्य, शिवसेना १८ सदस्य, भारतीय जनता पार्टी ३ सदस्य असे संख्या बळ आहे. अडीच वर्षाच्या पहिल्या टर्ममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदिती तटकरे यांनी अध्यक्ष पद भूषविले आहे. आता शेतकरी कामगार पक्षाची अध्यक्षपदाची टर्म आहे. अनुसूचित जमाती महिला आरक्षण रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी जाहीर झाले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत