रायगड जिल्हा परिषद शाळा टेंभरे येथे क्रीडा गणवेश वाटप

टेंभरे : रायगड माझा वृत्त 

शनिवार दि.२०/०७/२०१९ रोजी जनसेवा मित्र मंडळ सेक्टर ९ वाशी नवी मुंबईयांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा टेंभरे ता.कर्जत जि. रायगड या अतिशय दुर्गम व आदीवासी क्षेत्रात असलेल्या शाळेस भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश व स्पोर्ट शूज चे वितरण केले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री.कोळी सर यांनी प्रास्ताविक केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी ईश स्तवन व स्वागतगीत सादर करून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ.कांचनताई म्हात्रे यांनी भूषविले.
या कार्यक्रम प्रसंगी विनय म्हात्रे यांनी विध्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.”संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचे व शाळेसाठी सर्व प्रकारची मदत,सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.”माजी सरपंच हरेश घुडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत केल्याबद्दल जनसेवा मित्र मंडळाचे कौतुक केले तसेच उद्योजक श्री.देशमुख साहेब .संतोष निलधे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी विनय म्हात्रे, सौ.कांचनताई म्हात्रे, जनसेवा मित्र मंडळाचे कार्यकर्ते,श्री.हरेशशेठ घुडे(मा.सरपंच),श्री.देशमुख साहेब,श्री.संतोषजी निलधे (उद्योजक)कैलासजी निलधे (अध्यक्ष smc) श्री.अशोकशेठ जाधव,ग्रामस्थ मंडळ टेंभरे,शाळेतील शिक्षक श्री.कोळी सर श्री. संकपाळ सर श्री.गहीने सर श्री.सुडके सर उपस्थित होते.श्री.संकपाळ सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत