रायगड जिल्हा सामान्य रूग्णालयातील अंतर्गत कामांसाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर!

अलिबाग : मिथुन वैद्य  

अलिबाग, रायगड जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत अलिबाग येथील जिल्हा सामान्य रूग्णालय येथे अंतर्गत इमारतीचे बळकटीकरण करणे, आंतररूग्ण कक्षाच्या रॅम्पची पुनर्बांधणी करणे, जिल्हा रूग्णालयातील अंतर्गत कॉंक्रीट रस्ते बनविणे, या एकूण रू. ३ कोटी ५० लाख ४४ हजार रक्कमेच्या कामांना पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी मंजूरी दिली असून कोविड-१९ करिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत या कामांना मंजूरी देण्यात आली असून प्रशासकीय मान्यताही प्रदान करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आंतररूग्णांना तसेच विशेषत: दिव्यांग रूग्णांनाही आवश्यक त्या सुविधा मिळणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत