रायगड जिल्ह्यात म्हसळा शहरातुन गुटख्याचा पुरवठा

अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

मुरूड : अमूलकुमार जैन

महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी आहे. मात्र तरीही रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुटखा हा चूप चूप के पध्दतीने विकला जात असून म्हसळा तालुक्यातुन ह्या गुटख्याच्या पुरवठा होत असल्याची विशेष माहिती काही किरकोळ दुकानदारांनी नाव न सांगण्याचा अटीवर आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
रायगड जिल्ह्याच्या  कानाकोपर्‍यात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने गुटखा विक्री सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक  पानटपरीधारक, व ईतर दुकानदार यांनी केवळ वरकमाईसाठी गुटखा पाकीटे अवैध मार्गाने खरेदी करून विक्री सुरू ठेवल्याने या गुटखा बंदीचा जिल्ह्यात  प्रशासनाच्या वरदहस्ताने फज्जा उडाला आहे. वृत्तपत्रात गुटख्याबाबत वृत्त येताच प्रशासनाचे  अधिकारी किरकोळ एखाद-टपरी धारकांवर कारवाई करून वेळ मारुन नेतात व ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ असे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळते.
जिल्ह्यात शासकीय कार्यलाय,मोक्याच्या ठिकाणी शाळा, बसस्थानक आदी भागात पानटपरी, किराणा दुकानांमध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विकले जात आहेत. अवैध गुटखाविक्री करणार्‍यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे असल्याने पोलीस त्यांच्याकडे बोट दाखूवन कारवाई करत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच शहरात व परिसरात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे. या अवैध विक्रीतून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे, यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांमधून होत आहे.
शासनाने गुटखा बंदीचा कायदा केला. मात्र बंदीमुळे सध्या गुटखा तिप्पट ते चौपट किंमत घेवून विकला जात आहे. स्थानिक माफीया गुटखा पॅकेटला कागद गुंडाळून विक्री करतात. गुटखा विक्री करणार्‍या टोळ्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. असल्यामुळे यावर कारवाई होणार तरी कधी? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. रायगड जिल्ह्यात गुटखा बंदीचा पूर्ण फज्जा उडाला असून शासनाची गुटखा बंदी खरच आहे का? असा गंभीर प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
 सर्वच पान टपर्‍यांवर गुटख्याची विक्री होत असून गुटखा विक्री करणार्‍यांचे पूर्ण रॅकेटच  संपुर्पण रिसरात कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. गुटखा खाणार्‍यांना गुटखा विक्रीची दुकाने सापडतात. मात्र अन्न औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना त्याचा पत्ता का लागत नाही? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्‍न आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गुटखा चोरट्या मार्गाने आयात होतो आणि तो खुलेआम विकला जातो. अनेक गुटखा व्यापार्‍यांची मोठी गोडावून ही ग्रामीण भागात आहे. १८ वर्षाखालील कुणीही तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी विक्री करू नये असे न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानंतरही शाळांसमोर गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत