रायगड भूषण डॉ.अजय मोरे यांना समाज भूषण पुरस्कार

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

माणगांव येथील डॉ. अजय आत्माराम मोरे यांना संगणक शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक व चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल रविवार दि. ०१ जुलै रोजी अलिबाग येथेअखिल बुरुड प्रतिष्ठान संघटना ठाणे (रजि.) तर्फे आबासाहेब पवार, प्रविण रुईकर व इतर मान्यवरांच्या हस्ते ‘समाज भूषण पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले.

रायगड भूषण डॉ.अजय मोरे यांना समाज भूषण पुरस्कार

रायगडमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अल्प दरात संगणक शिक्षण मिळावे या उद्देशाने डॉ. अजय मोरे यांनी रायगड इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीस माणगांव या कॉम्प्युटर सेंटरची स्थापना केली. या सेंटरच्या आता रायगडमध्ये १८ फ्रांचायसी सुरु आहेत. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने मोरे एज्यूकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली यामध्ये भरारी यशाची, सकारात्मक विचारातून प्रगतीकडे…! या व्याख्यान्मय कार्यक्रमातून विद्यार्थांना प्रेरणा देण्याचे काम केले जाते, दर वर्षी दहावी व बारावी नंतर काय या व्याख्यान्मय कार्यक्रमातून विद्यार्थांना मार्गदर्शन केले जाते.

या वर्षी दहावी व बारावीच्या विद्र्यार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी वाट दाखवतो क्षितीजाची या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि ०५ जुलै रोजी द.ग.तटकरे महाविद्यालय माणगांव येथे सकाळी केले आहे. यावेळी पुण्याचे सुप्रसिद्ध व्याख्याते मा. वंदन राम नगरकर व मा. विवेक वेलणकर मार्गदर्शन करणार आहेत. लहानापासून अभिनयाची प्रचंड आवड असणाऱ्या डॉ. अजय मोरे यांनी रायगड जिल्हातील कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून अष्टविनायक कला अकादमीची स्थापना करीत रायगडमधील ३५ कलाकारांना घेऊन गेल्या १० वर्षात महाराष्ट्रभर जय हो या सामाजिक विषयावर विनोदी स्वरुपात भाष्य करणाऱ्या धमाल विनोदी नाटकाचे आतपर्यंत 150 विक्रमी प्रयोग केले आहेत.

याच संस्थेच्या मार्फत माणगांवमध्ये अनेक नवनवीन उपक्रम सुरु केले यामध्ये राज्यस्तरीय मराठी एकांकीका स्पर्धा-रायगड करंडक, स्त्रियांसाठी सावित्रीबाई फुले पुरस्कार योजना, माणगांवकरांसाठी नाट्य सभासद तर दर वर्षी नाट्य व फिल्म प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन असे अनेक धाडसी प्रयत्न करीत त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ.अजय मोरे यांनी केलेल्या कार्याची पोहोच पावती म्हणून रायगड भूषण पुरस्कारांसह सर्वोच्च मोकिंग डेव्हलपमेंट ऑफ इंडिया अशा अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे तसेच श्रीलंका, भूतान आणि नेपाळ या देशांमध्ये त्यांचा सन्मान झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत