रायगड मध्ये पावसाळी  पर्यटनासाठी आचारसंहिता 

मान्सून काळात तालुक्यातील विविध धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटक येत असतात. या ठिकाणी अपघात होऊन पर्यटकांच्या मृत्यू होण्याच्या घटना मागील वर्षी मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मान्सून २०१८ मधील येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पर्यटकांचे मृत्यू रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून बचाव साहित्य व सूचना फलक लावण्यात यावेत. होमगार्ड, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, जीवरक्षक नेमण्यात यावेत, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच वन विभागाकडून प्रबळगड, पेठकिल्ला, इशाळगड या गड, किल्ल्यांवर जाण्यासाठी पर्यटकांची नोंदणी करण्याच्या सूचना देखील दिल्या. या गडांवर जाण्याकरता स्थानिक युवकांना गाईड म्हणून प्रशिक्षित करुन त्यांच्यासोबत ट्रेकिंगला जाण्यासाठी नाव नोंदणी बंधनकारक करण्यात येणार आहे.

यामध्ये पर्यटकांनी निसर्गाचा आनंद मनसोक्त घ्यावा. मद्यपान करुन  धबधब्याच्या ठिकाणी जावून स्वत:चा जीव धोक्यात घालू नये. त्यामुळे जीवीतहानी टाळण्याच्या दृष्टीने धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान करण्यात प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच यावर्षी पोलीस बंदोबस्तामध्येही वाढ करण्याचा ‍निर्णय घेण्यात आला आहे.

जे लोक धबधब्याच्या ठिकाणी व परिसरामध्ये मद्य विक्री किंवा उपलब्ध करुन देतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे धबधब्याच्या ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे.

वाहतूक पोलीस विभागाकडून धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान करणाऱ्या व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. तरी पावसाळ्यात पर्यटकांचे मृत्यू रोखण्यासाठी वरील उपाययोजनेस सहकार्य करावे, असे आवाहन रायगड अलिबागचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

 

शेयर करा

One thought on “रायगड मध्ये पावसाळी  पर्यटनासाठी आचारसंहिता 

  1. Paryatan sthalachya javalchya gavatil yuvakani paryavarn satrk groups banvun parytakana plastic kachara ani daru pinyas majjav karnyasathi kahitari upay yojana keli pahije karan to sarv kachara plastics ani futlelya kachanche tukade shetat vahun yetat tyamule shetiche tar nuksan hote pan shetkaryana kacheche tukade lagun ija hote

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत