रायगड मध्ये शिवसेना भाजपा युती मध्ये पहिली ठिणगी; मावळ लोकसभेवर भाजपचा दावा

रायगड  माझा वृत्त : विपुल उभारे  आणि अजय  गायकवाड
शिवसेना भाजपा युती झाल्याचे  परिणाम आता राज्यात दिसू लागले आहेत. रायगड मध्येही भारतीय जनता पार्टीने  युती मध्ये आपले स्थान भक्कम करण्यासाठी विधानसभेच्या अधिक जागांसह मावळ लोकसभा मतदार संघावर दावा ठोकल्याने  युती मध्ये पहिली ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना आणि भारतीय जनता  पार्टी यांची  युती होऊन काही दिवस होत नाहीत तर अनेक ठिकाणी याबाबतची मतमतांतरे समोर  येऊ लागली आहेत.  प्रत्येक जिल्ह्यात आपल्या पेक्षा युती मधील पक्ष मोठा होणार नाही याची  काळजी दोन्ही पक्ष घेताना दिसत आहेत . रायगड यामध्येही भाजपाने  अशीच  आक्रमक भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. लोकसभेचा रायगड मतदार  संघ हा शिवसेनेकडे आहे . त्यामुळे रायगड  लोकसभा मतदार संघातील श्रीवर्धन आणि पेण  हे दोन   आणि मावळलोकसभा  मतदार संघातील उरण आणि पनवेल   मतदार संघ अशी रायगडातील चार मतदार संघ भारतीय  जनता पक्षाला मिळावे असा ठराव भारतीय  जनता  पक्षाच्या  जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते संमत  झाला आहे . केवळ विधानसभा मतदार संघावर न थांबता मावळ लोकसभा मतदार संघावर देखील भाजपाने आपला दावा प्रस्थापित करताना महापालिका ,  विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाला मिळालेल्या मतांची आकडेवारी पुढे केली आहे.
भाजपाचे   जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत  ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पाली तालुक्यातील झाप  येथे हि बैठक झाली . यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कृष्ण कोबनाक यांच्यासह अनेक तालुकाध्यक्ष उपस्थित होते . आता रायगड जिल्ह्यातील सात पैकी चार मतदार संघावर आणि थेट मावळ लोकसभेवर भारतीय जनता पार्टीने  दावा ठोकल्याने शिवसेना काय  भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मावळ लोकसभा  मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे ती आमदार आहेत . पनवेल आणि पिंपरी  चिंचवाड दोन महानगर पालिकेवर भाजपची एक हाती सत्ता आहे .या मतदार संघात  साडेचार लाख मते  भाजपने कमळ  चिन्हावर मिळवली आहेत . आमच्या वाढलेल्या ताकदीच्या जोरावर हा मतदारसंघ भाजपाला मिळावा अशी सर्व कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी आहे.

_दीपक बेहरे, सरचिणीस ,भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत