रायगड : शिस्ते गावातील ग्रामस्थांची शिवारफेरी

जलसंधारण, वृक्षारोपण, जलसिंचन यासारखे प्रभावी उपक्रम राबवणार-सरपंच रमेश घरत 

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने विविध खात्यांतर्फे आज जलयूक्त अभियानाअंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावाच्या परिसरात शिवार फेरी काढून शेतात जावून विविध खात्यांची विकास कामे शासनाला सुचवण्यात आली. 

सत्तर लाख रुपयांचा विविध प्रकारच्या कामांचा अंदाजित आराखडा एक वर्षांचा तयार करण्यात येणार असून भविष्यात यामधून अनेक फायदे होणार आहेत.कृषि विभाग,महसूल विभाग,ग्रामपंचायत,जलसंपदा विभाग यासह अधिकारी,पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी शिवार फेरी काढून शेतकर्‍यांणा या योजनेचे व मोहिमेचे महत्व सांगून त्यांना अपेक्षित असलेल्या कामांची माहिती घेण्यात आली. शिवार फेरीत प्रस्तावित करण्यात येणार्‍या कामांना शासन निधि उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे शेत्क्र्यांणा याचा खूप मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
या शिवार फेरीत शिस्ते सरपंच रमेशजी घरत उप सरपंच अनंत भायदे,सदस्य संतोष कांबळे,रामदास कांबळे नीता घरत,गीता मोहीत,सारिका धुमाळ  व इतर ग्रा.प. सदस्य ग्रामविकास अधिकारी रहाटे,जल साधरण खात्याचे रमेश फेरावणे,पाणी पुरवठा कांबळे कृषि सहाय्यक मगर यांच्यासह आगरी समाज उपअध्यक्ष योगेश धुमाळ, ग्रामस्थ सखाराम कांबळे,प्रमोद नाक्ती,गजानन चाळके,संजु पाटील,उपस्थित होते.या वेळी जलसंधारण मार्फत बंधारे बांधण्यासाठी छत्तीस लाख तर विहीरी साठी पाणी पुरवठा खात्याकडून दहा लाख उरवरीत कुषी खात्याकडून वेगवेगळ्या योजना राबणार असुन यामध्ये
टॅंकरमूक्त गाव करणे,विहीर,बोअर वेल,साठवण तलाव आदीमधील पाणीसाठा वाढवणे तसेच ओढा रुंदीकरण,खोलीकरन,गाल काढणे,ओढे  नाले यावर सीमेंट बंधारे बांधणे,ओढा रुंदीकरण, माती नाल बांधा, समतल सलग चार काढणे,आदि जळसाठा वादवण्यांची व जमिनीची धूप होणार नाही यासाठी गरजेची असणारी सर्व कामे यात प्रस्तावित आहेत.
यामुळे ओढे,बंधारे मोकळे होऊन त्यात पानी साठा होऊन नदीकाठावरील शेतकर्‍यांणा त्या पाण्याचा लाभ होणार आहे. फेरीत परिसरात उपलब्ध असलेल्या पाझर तलावाच्या नेक साईट यावेळी फेरीतील अधिकार्‍यांना दाखवण्यात आल्या. सामाजिक वनीकरण विभागातर्फे शिस्ते गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हावी अशी शेतकर्‍यांणी यावेळी मागणी केली.
पहाणी करण्यात आलेल्या अनेक कामांचा साधारणत: सत्तर लाख  रुपयांच्याही पुढे अंदाजित खर्च अपेक्षित असल्याचे सरपंच रमेश घरत यांनी सांगितले.गावची उंच टेकडी, मध्य पठारापासून मैदानी भागापर्यंत सर्व जागांचे अवलोकन करून त्या ठिकाणी जलसंधारण, वृक्षारोपण, जलसिंचन यासारखे प्रभावी उपक्रम राबवण्याचा मानस यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत