रायगड साठी 20 हजार रॅपिड अँटीजन टेस्ट किटस उपलब्ध; चाचणीला सुरुवात

अलिबाग (रायगड) : धनंजय कवठेकर

 रायगड जिल्ह्यात कोरोना रुगणांची संख्या झपाट्याने वाढते आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची सुरुवातही झाली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात 150 हुन अधिक शासकीय कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. जिल्ह्यासाठी 20 हजार किटस उपलब्ध झाले आहेत. या चाचणीचा अहवाल अवघ्या अर्ध्या तासात मिळणार असून जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात ही चाचणी केली जाणार आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . सुहास माने यांनी दिली.

टेस्टचा रिपोर्ट मिळण्यास विलंब होत असल्याने कोरोनाचा अटकाव करणे कठीण झाले होते. आता ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब करून रॅपिड अँटीजन टेस्ट केल्यामुळे  रुग्णावर तातडीने उपचार शक्य होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत