रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांना वेतन वाढ आणि सुविधा द्या भाजपा रायगड जिल्हा कामगार आघाडीची मागणी

साहिल रेळेकर – पनवेल

नवी मुंबईतील सुरक्षा रक्षकांप्रमाणेच रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांना वेतन वाढ आणि सुविधा मिळाव्यात, अशी मागणी भाजपा रायगड जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे केली आहे.

रायगड सुरक्षा मंडळातील व नवी मुंबई मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात व सुविधांमध्ये फरक आहे. “समान कामाला समान वेतन मिळाले पाहिजे” ह्या उद्देशावर रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांना मुंबई व नवी मुंबईतील सुरक्षा रक्षकांप्रमाणेच वेतनवाढ व इतर सोयी सुविधा मिळाव्यात यासाठीचे निवेदन जितेंद्र घरत यांनी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे चेअरमन चौधरी यांना दिले.

यावेळी वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस मोतीलाल कोळी, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, भाजपा कामगार आघाडीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील, भाजपा कामगार आघाडीचे रायगड जिल्हा चिटणीस जगदीश म्हात्रे आदी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.