राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने नितीन गडकरी रुग्णालयात

राहुरी : रायगड माझा वृत्त 

Nitin Gadkari health News | राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने नितीन गडकरी रुग्णालयात

राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान चक्कर आल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान,  राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना अचानक चक्कर आली, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले. दरम्यान, नितीन गडकरींची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी नितीन गडकरी आले होते. यावेळी त्यांनी भाषणही केले. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने गडकरी कोसळले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या राज्यपालांनी गडकरींना सावरले. तसेच डॉक्टरांनी तातडीने गडकरी यांची तपासणी केली. त्यानंतर गडकरी यांना रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने त्यांना भोवळ आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, या घटनेनंतर नितीन गडकरींचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसेच गडकरी यांना विशेष विमानाने नागपूर येथे नेण्यात येणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत