राष्ट्रवादीचा गड उध्वस्त, कर्जत नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा

कर्जत : रायगड माझा वृत्त
युती आणि आघाडीकडून अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारलीये. थेट नगरध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांनी राष्ट्रवादीच्या प्रतीक्षा सुरेश लाड यांचा २६९४ मतांनी पराभव केला. अठरापैकी दहा जागा जिंकून कर्जत नगरपरिषदेची सत्ता काबीज केली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा गड पण गेला आणि सिंह पण गेला अशी स्थिती झाली आहे.

कर्जत नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महाआघाडीसमोर शिवसेना भाजप आरपीआय या महायुतीने मोठे आव्हान उभे केले होते. अनेकांचे अंदाज फोल ठरवीत शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांनी या निवडणुकीत आमदार सुरेश लाड यांच्या कन्या प्रतीक्षा लाड यांचा दणदणीत पराभव केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात युतीला मिळालेल्या यशाने त्यांच्या विजयाचा पाया रचला गेला. दहिवली, गुंडगेसह प्रभाग क्रमांक ४ आणि ५ या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी मागे पडली. निकालादरम्यान शिवसेना, भाजपा आणि आरपीआय युतीच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा जल्लोष पाहायला मिळत होता. नगराध्यक्ष पदासह युतीच्या दहा जागांवर विजय मिळविला आहे. यामध्ये शिवसेनेला चार, आणि भाजपला चार जागांवर विजय मिळाला असून आरपीआय देखील दोन जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला आठ जागांवर विजय मिळाला आहे. युतीने सत्ता काबीज केल्यानंतर युतीच्या नेत्यांनी हा विजय परिवर्तनाचा असल्याचे सांगून आमदार सुरेश लाड यांना धक्का दिल्याचे सांगितले. आणि हाच विजय विधानसभेला देखील पाहायला मिळणार असल्याचे देखील संकेत दिले.

आपल्या विजयानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांनी हा विजय युतीचा असल्याचे सांगून त्यांनी कर्जत करांचे आभार मानले. कर्जत नागर्परीशादेला आदर्श नगरपरिषद बनवण्याचे ध्येय्य त्यांनी समोर ठेवल्याचे सांगितले.

कर्जत नगर परिषदेवर स्थापनेपासूनच राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र या निवडणुकीत या वर्चस्वाला तडा गेला आहे. कर्जतच्या जनतेने आपला कौल परिवर्तनाच्या बाजूने टाकत राष्ट्रवादीची २५ वर्षापासूनची सत्ता शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या ताब्यात दिली आहे. त्यामुळे आमदार सुरेश यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या या निवडणुकीत हार पत्करावी लागली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत