राष्ट्रवादीचे अनुपम कुलकर्णी यांनी दिला उपशहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पाली : विनोद भोईर

राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते तथा पाली शहरउपाध्यक्ष आणि वसंतराव ओसवाल यांचे खंदे समर्थक असणारे अनुपम कुलकर्णी यांनी पाली शहर उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय.  कुलकर्णी यांनी अचानकपणे दिलेल्या पदाच्या राजीनाम्याने पाली शहरात चर्चेला उधाण आले असून याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

याबाबत सविस्तर माहिती देतांना कुलकर्णी यांनी सागितले की २२ मे रोजी राष्ट्रवादी कॉग्रेसची तातडीची बैठक वसंत ओसवाल यांच्या कार्यालयात लावण्यात आली सदर बैठकीस मला देखील बोलावल होत व मी उपस्थित होतो. त्या बैठकीत पाली ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात फॉर्म भरणे व मागार घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. सदर चर्चेत प्रभाग क्रमाक ३ मधून ज्या अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामागे अनुपम कुलकर्णी यांचाच हात असल्याचे आरोप पक्षातील काही जेष्ठ नेते मंडळींनी माझ्यावर केले व मी पक्षविरोधी काम केल्याने मला पक्षातून बडतर्फ करण्यात यावे याकरिता ही खास दबावाची बैठक लावण्यात आली असल्याचे कुलकर्णी यांनी सागितले.

सदर बैठीकीत  राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्यावर बेछूट आरोप केल्याने मला खूप मनस्तापही झाला. गेली कित्येक वर्ष आम्ही पक्षवाढीसाठी दिवसरात्र झटून माझ्या पदरी अपमानच येत असेल तर पक्षात कशासाठी राहायच आणि आजून किती काल आपली सेवा पक्षासाठी द्यायची या सर्व प्रकारामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा पाली शहराध्यक्ष अभिजित चांदोरकर यांचे कडे दिला आहे. मी राजीनामा दिल्याचे समजताच पाली शहरासह तालुक्यातील मला मानणारा तरूणवर्ग व पक्ष कार्यकर्त्यांनी माझ्याकडे गर्दी केली आहे. व आम्ही आपल्या पाठीशी आहोत तुम्ही फक्त निर्णयघ्या, परंतु मी सध्या कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु पालीच्या विकासासाठी व पालीकराच्या भल्यासाठी जो निर्णय माझ्याकडून अपेक्षित आहे तो निर्णय मी व माझे सहकारी तसेच पालीतील नागरिकांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल असे कुलकर्णी यांनी शेवटी सागितले .

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत