राष्ट्रवादीचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या पोलीस चौकशीचे आदेश

मुंबई: रायगड माझा 

लेटरहेडचा गैरवापर करून काम केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल नार्वेकर यांची पोलीस चौकशी करण्याचे आदेश मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.

आमदार राहुल नार्वेकर, त्यांच्या वहिनी नगरसेविका हर्षिता नार्वेकर आणि भाऊ मकरंद नार्वेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याची तक्रार करण्यात आलीय. लेटरहेडवर खोट्या सह्या करून कामं करून घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

 

सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. लेटरहेडवरील सह्यांची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. तर त्यांची वहिनी हर्षिता या वॉर्ड क्रमांक २२६ च्या नगरसेविका आहेत. तर भाऊ मकरंद नार्वेकर वॉर्ड २२७ चे नगरसेवक आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत