राष्ट्रवादीचे जितेंद्र सातनाक श्रीवर्धनचे नवे नगराध्यक्ष; जितेंद्र सातनाक ७ मतांनी विजयी

शिवसेनेचे उमेदवार अनंत गुरव पराभूत; राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस आघाडीचे जितेंद्र सातनाक विजयी

श्रीवर्धन : साहिल रेळेकर

श्रीवर्धन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे हे दीर्घकालीन रजेवर गेल्याने नगराध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी यांनी निवडणूक जाहीर केली होती. या नगराध्यक्षपदाची निवडणूक आज शुक्रवार २५ सप्टेंबर रोजी पार पडली. या निवडणूकीत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस आघाडीचे उमेदवार जितेंद्र सातनाक हे ७ मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अनंत गुरव यांचा पराभव केला.

शिवसेनेचे अनंत गुरव यांना ५ मते पडली तर विजयी उमेदवार जितेंद्र सातनाक यांना १२ मते पडली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जितेंद्र सातनाक विजयी झाल्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. जितेंद्र सातनाक यांनी यापूर्वी उपनगराध्यक्ष तसेच श्रीवर्धन नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे अनुभवधारक नगराध्यक्ष श्रीवर्धनला लाभले असल्याची प्रतिक्रीया श्रीवर्धन मधून व्यक्त होत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत