राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : रायगड माझा वृत्त

राष्ट्रवादी काॅंग्रेसला हातकणंगले मतदारसंघात झटका बसला असून माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत आज शिवसेनेत प्रवेश केला. धैर्यशील हे आता हातकणंगले मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.हातकलंगले मतदार संघातील विद्यमान खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांची गेल्या आठवड्यात भेट झाल्यानंतर या मतदारसंघातील समीकरणे बदलणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार तसेच घडले. शरद पवार यांनी कोल्हापूर दाैऱ्यात शेट्टी यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला होता. माने कुटुंबीय तडजोडीच्या भूमिकेत नसल्याने धैर्यशील यांनी थेट  मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतले. त्यांचा भगवा झेंडा हाती घेतलेला फोटो व्हायरल झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत