राष्ट्रवादीच्या या आमदाराला मुख्यमंत्र्यांकडून थेट ‘वर्षा’वर बोलावणं; भाजप प्रवेशाबाबत चर्चा?

मुंबई : रायगड माझा 

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते व आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील आणि त्यांच्या शिष्टमंडळास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरून चर्चेसाठी पाचारण करण्यात आले आहे. आज सायंकाळी साडेसहा वाजता वर्षा बंगल्यावर बैठक होणार असून त्यात नेमका काय निर्णय होतोय, यावर युनियनची पुढील दिशा निश्चित होणार असल्याचे युनियनचे सरचिटणीस आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.

नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार आहेत. पुढील महिन्यात त्यांची आमदारकीची मुदत संपत आहे. गेल्या एक- दोन वर्षापासून नरेंद्र पाटील भाजपमध्ये जाणार अशा वावड्या उटत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जवळिक लपून राहिलेली नाही. गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे कोकण पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी मुंबईतील भाजप कार्यालयात डावखरे यांना सोडायला नरेंद्र पाटील गेले होते. त्यामुळे नरेंद्र पाटील लवकरच राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये जातील असा कयास बांधला जात आहे. भाजप पुन्हा त्यांना विधान परिषदेची संधी देणार असल्याचे कळते आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत