राष्ट्रवादीला धक्का; रमेश कराड यांची माघार ;अशोक जगदाळेंना उमेदवारी

लातूर : रायगड माझा

लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद मतदारसंघातील निवडणुकांआधीच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. रमेश कराड यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.

 रमेश कराड राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेले होते. पण, काही दिवसांपूर्वीच पक्षांतर्गत होणाऱ्या घुसमटीमुळे स्वगृही परतले. त्यांच्या प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी  काँग्रेसला मोठी बळकटी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण आज त्यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

कोण आहेत रमेश कराड ?

कराड हे गोपिनाथ मुंढे यांचे कट्टर समर्थक होते. ते एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष  विश्नवाथ कराड यांचे पुतणे  आहेत. त्यांनी दोनवेळा भाजपकडून लातूर ग्रामिणची विधानसभा निवडणूक लढवली होती परंतु, ते पराभूत झाले होते. लातूर जिल्हा बँकेची निवडणूकही ते नाणेफेकीत हरले होते.

अशोक जगदाळे यांना उमेदवारी 

रमेश कराड यांनी अर्ज मागे घेतल्याने लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षाचे नेते अशोक जगदाळे हे निवडणूक लढवणार आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना उमेदवारी जाहीर केल्याची माहिती, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट करून दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत