‘राष्ट्रवादी’ उद्या कंदील आंदोलन

मुंबई : रायगड माझा वृत्त 

भारनियमनामुळे राज्यातील जनता हैराण झाली असून, याविरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने ज्या-ज्या ठिकाणी भारनियमन आहे त्या ठिकाणी 12 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता “कंदील’ आंदोलन करण्यात येणार आहे.

NCP

 

शिवाय युवक संघटनेच्या वतीने वीज मंडळाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करून निषेध नोंदविला जाणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. भारनियमन सुरू आहे त्या ठिकाणी “राष्ट्रवादी’च्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या कंदील आंदोलन करणार आहेत. शिवाय “राष्ट्रवादी’ची युवक संघटना वीज मंडळाच्या कार्यालयासमोर वैध मार्गाने आंदोलन करून जाब विचारणार आहे, असे ते म्हणाले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत