राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी मराठवाड्यातील युवा नेते मेहबूब शेख यांची निवड

राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी मराठवाड्यातील नेत्याची निवड

मुंबई : रायगड माझा वृत्त

मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांनी मेहबूब शेख यांची युवक प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आल्याचे पत्र दिले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये एक खर्डा वक्ता म्हणून मेहबुब शेख यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने मेहबुब शेख यांची निवड केल्यामुळे निवडणुकीत युवकांची मोठी फळी काम करताना दिसणार आहे, पक्षाकडून असा विश्वास यानिमित्तानं व्यक्त करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी मराठवाड्यातील युवा नेते मेहबूब शेख यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान युवक कार्याध्यक्ष पदी रविकांत वर्पे आणि सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्षपद काही महिने रिक्त होते. या पदासाठी मेहबूब शेख, रविकांत वर्पे, सुरज चव्हाण यांची नावे चर्चेत होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत