राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केरळ पूरग्रस्तांसाठी १ कोटी रुपयाची मदत

 

रायगड माझा वृत्त 

मुंबई: केरळमध्ये अतिवृष्टीचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. पूर आणि भूत्सखलनामुळे ३०० पेक्षा अधिक अधिक नागरिकांचा मृत्यू झला आहे. तर १० हजारांपेक्षा जास्त नागरिक विस्थापित झाले आहेत. केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी जगभरातून लोक पुढे येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयाची मदत दिली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार केरळ पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून केरळ सरकारला रू. 1 कोटीची मदत देण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केरळचे सरचिटणीस सलिम मॅथ्यू यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.

हा धनादेश पक्षाचे केरळ प्रदेशाध्यक्ष थॉमस चँडी यांच्याकडे देण्यात येईल. त्यांच्यामार्फत केरळच्या मुख्यमंत्र्यांना ही मदत सुपूर्द करण्यात येईल. आर्थिक मदतीसह इतर साहित्याबाबतही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मदत केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत