राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील गव्हाणे

जितेश सरडे यांचे नाव मागे पडले

महाराष्ट्र News 24 वृत्त

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडच्या सुनील गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी आणि पश्चिम महाराष्ट्रच्या विभाग प्रमुखपदी सुहास विजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहण यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी पारनेरच्या जितेश सरडे यांची नियुक्ती नक्की मानली जात होती. मात्र निष्ठावंत नाराज होतील यामुळे शेवटच्या क्षणी त्यांचं नाव मागं पडल्याचं कळत आहे. त्याऐवजी पिंपरी-चिंचवडच्या सुनील गव्हाणे यांच्या नावाला पसंती देण्यात आली.जितेश सरडे यांच्यावर  आयटी सेल ची जबाबदारी देण्यात आली  आहे. पुणे जिल्हा विभाग प्रमुखपदी संध्या उद्धव सोनावणे, कोकण विभाग प्रमुखपदी किरण गोरखनाथ शिखरे, मराठवाडा विभाग प्रमुखपदी प्रशांत कैलाश कदम, अमरावती विभाग प्रमुखपदी अविनाश सत्येंद्रनाथ चव्हाण, नाशिक विभाग प्रमुखपदी चिन्मय अविनाश गाढे, नागपुर विभाग प्रमुखपदी आशिष प्रकाश आवळे यांची तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आयटी विभाग प्रमुखपदी जितेश सुरेश सरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी  नव्याने निवड झालेले सुनील गव्हाणे हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात . आता राज्यभरात या नियुक्त्यांचे कसे स्वागत केले जाते हे पहाणे महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत